Home » महाराष्ट्र » लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी e-KYC दुरुस्तीची संधी; ३० एप्रिलपर्यंत मुदत

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी e-KYC दुरुस्तीची संधी; ३० एप्रिलपर्यंत मुदत

मुंबई, दि.3 — मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी शासनाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. e-KYC न झाल्यामुळे किंवा त्रुटीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांना आता पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शासनाच्या अधिकृत माहितीनुसार, लाभार्थ्यांना ३० एप्रिल २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांचे e-KYC अपूर्ण आहे किंवा चुकीचे झाले आहे, त्या लाभार्थ्यांना आता पुन्हा अर्ज दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत अनेक महिलांना आर्थिक लाभ दिला जात असून, e-KYC पूर्ण न झाल्यास लाभ थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पात्र महिलांनी दिलेल्या मुदतीपूर्वी आपली प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, e-KYC दुरुस्ती न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *