बेशुद्धीचे इंजेक्शन देताच बिबट्या पिंजऱ्यात अडकला !
यावल : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यानंतर तालुक्यातील डांभुर्णी शिवारात दोन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने उचलून नेऊन ठार केल्यानंतर अखेर वनविभागाच्या तातडीच्या कारवाईत बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. दि. १७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.३० ते १.०० वाजेच्या सुमारास प्रभाकर चौधरी यांच्या मा.ग.क्र. ७४१ मधील शेतात झोपलेल्या रत्ना सतीश ठेलारी (वय…