महसूल मंत्र्यांचे नाव सांगून शेतकऱ्याची फसवणूक !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने फोन करून एका शेतकऱ्याची फसवणूक करण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला बावनकुळे साहेबांचे पर्सनल असिस्टंट असल्याचे भासवत शेतकऱ्याला फोन केला आणि त्याचे काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्कॅनर पाठवून पैसे पाठवण्याची मागणी केली…