कर्जमाफीची चाहूल; राज्यभर थकीत शेतकऱ्यांची यादी तयार करण्यास वेग
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर राज्य सरकारने महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केली असून सर्व बँकांना थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती शासनाने नियुक्त केलेल्या शिंदे समितीकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या हालचालींमुळे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे आशेचे वातावरण निर्माण झाले…