गोरगरीब महिलांना पैशाच्या लोभात फसवून अंडाशय विक्री; पोलिसांनी रॅकेट फोडला
बदलापूर : वृत्तसंस्था बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांच्या लोभात फसवून त्यांच्या अंडाशयांची बेकायदेशीर तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणानंतर बदलापूर पोलीस ठाणे यांनी रॅकेटमध्ये सहभागी तीन महिलांना ताब्यात घेतले असून, आणखी किती महिलांना याचा बळी पडला आहे, याचा तपास सुरू आहे. बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर…