जळगाव तालुक्यात धडक कारवाई : वडनगरीत अवैध वाळू उपशावर महसूल प्रशासनाचा मोठा प्रहार !
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडनगरी येथे आज सकाळी महसूल प्रशासनाने अवैध वाळू उपशावर धडक कारवाई करत वाळू काढण्याचे यंत्र आणि दोर जप्त केले. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आपल्या पथकासह थेट नदीपात्रात उतरून ही कारवाई केल्याने वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून दिवस-रात्र अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या….