काटोल तालुक्यात औद्योगिक दुर्घटना; स्फोटात १५ जणांचा मृत्यू
नागपूर : वृत्तसंस्था नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) सकाळी भीषण स्फोट होऊन किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राऊळगाव लगतच्या येनवरा गावाजवळील कंपनीच्या…