जळगाव जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मान; मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार
जळगाव | दि. २८(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या “सेवाकर्मी प्लस” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मंत्री आशिष शेलार, तसेच…