गॅस टंचाईचा फटका; ग्रामीण भागातील कुटुंबांवर संकट, जेवण पुन्हा चुलीवर
नशिराबाद प्रतिनिधी :जळगाव जिल्ह्यासह नशिराबाद शहर आणि परिसरात एलपीजी गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिकांचे हाल होत आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक कुटुंबांवर जेवणाचीही समस्या निर्माण झाली असून ग्रामीण भागात पुन्हा एकदा मातीच्या चुली पेटल्याचे चित्र दिसत आहे. गॅस अभावी हॉटेल, खानावळ, चायनीज सेंटर तसेच चहा-नाश्ता विक्रेते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. प्रशासनाने व्यावसायिक…