April 30, 2025 3:41 pm

Home » जळगाव » सापळा रचून गावठी कट्टा विकण्यापुर्वीच संशयिताला एलसीबीने घेतले ताब्यात !

सापळा रचून गावठी कट्टा विकण्यापुर्वीच संशयिताला एलसीबीने घेतले ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

चाळीसगावला गावठी कट्टा विक्री करण्यासाठी जात असलेल्या मुद्दसीर नझर सलीम परवेझ शेख (रा. तांबापुरा, जळगाव) याच्या सापळा रचून बसलेल्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी कट्टा, पाच जीवंत काडतूस व तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात राहणारा मुद्दसीर नझर सलीम परवेझ शेख हा (एमएच ४७, बीयू ०३७७) क्रमांकाच्या दुचाकीवरुन चाळीसगाव येथे गावठी कट्टा विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. शिरसोली रस्त्यावरील जकातनाका परिसरात सापळा रचून बसलेले उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, राजेश मेढे, हरिलाल पाटील, विजय पाटील, अक्रम शेख यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून धारदार शस्त्रासह गावठी कट्टा व पाच जीवंत काडतूस व दुचाकी जप्त करण्यात आली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!