जळगाव : प्रतिनिधी
शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटर चालविणाऱ्या आंतराष्ट्रीय सिडर्डीकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. या सिर्डीकेटची व्याप्ती महाराष्ट्र, राजस्थान व पश्चिम बंगाल पर्यंत असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. या सिंडीकेटमधील मुख्य सूत्रधारांसह परदेशातील आणखी कोणी यात सहभागी आहेत या याचा शोध घेण्यासाठी अटकेतील ललित कोल्हेंसह आठ संशयितांना दि. ४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अॅमेझॉन इतर बँक व कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगून परदेशी नागरिकांना फसविणाऱ्या बनावट कॉल सेंटवर पोलिसांनी रविवारी छापा टाकला, शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या सिंडीकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर याठिकाणाहून ३१ लॅपटॉप, ७ मोबाईलसह इंटरनेट व कॉल सेंटरसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी राकेश आगारिया, ललित कोल्हे, नरेंद्र अगारिया, आदिल सैय्यद निशार अहमद सैय्यद, इम्रान अकबर खान, मोहम्मद जिशान नूरी पिता मो. नूर आलम, शाहबाज आलम मो. शाहबउद्दीन, साकीब आलम शहाबउद्दीन, मोहम्मद हाशिर मोहम्मद राशिद यांच्याविरुद्ध संघटीत गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार अधिनियमांतर्गत इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना दि. ४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
या गुन्ह्यातील आदिल सैय्यद निशार अहमद सैय्यद, इम्रान अकबर खान व अकबर हे तिघे मुंबई येथील असून कॉल सेंटरमध्ये काम करणारे हे कोलकता येथील असून त्यांची ओळख अशी झाली. त्यांना नोकरीसाठी कोणत्या माध्यमाचा वापर करुन त्यांना नोकरीवर ठेवले. तयाचा देखील पोलिसांकडून शोध घेतला जाणार आहे. ज्यांच्यावर मालकीच्या फार्म हाऊसवर बनावट कॉल सेंटर सुरु होते. ते माजी महापौर ललित कोल्हे यांच्यावर तब्बल १९ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासधिकारी गणापुरे यांनी न्यायालयात सांगितले, त्यावर संशयिताचे वकील अॅड. सागर चित्रे यांनी हे गुन्हे कोल्हे यांच्या राजकीय गुन्हे असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. फसवणुकीसाठी ग्राहकांचा डाटा कोठून मिळविला. तसेच संशयितांना बोगस कॉल सेंटर चालविण्यासाठी एक्स लाईट आणि व्हीपीएन सारख्या नेटवर्क वापरण्याचे प्रशिक्षण कोणी दिले याचा देखील तपास केला जात आहे.
कॉल सेंटरमध्ये मिळून आलेल्या लॅपटॉपमधून फसवणूक झालेल्यांची माहिती संकलीत केली जाणार आहे. तसेच त्याकरीता जप्त केलेले लॅपटॉप हे नाशिक येथे फॉरेन्सीकच्या लॅबमध्ये पाठविले जाणार असून तेथे यातील संपुर्ण डेटा कॉपी करुन त्यानुसार जप्त केला जाणार आहे.
