Home » जळगाव » अमळनेर » उसनवारीच्या ५ हजारांवरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

उसनवारीच्या ५ हजारांवरून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

अमळनेर : प्रतिनिधी

ताडेपुरा येथील भीमनगर परिसरात उसनवारीच्या पैशांच्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याची घटना १५ तारखेला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रोहित भरत फतरोड (रा. फकिरवाडा, ताडेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने सुमारे १५ दिवसांपूर्वी विकी सपकाळे याच्याकडून ५ हजार रुपये उसनवार घेतले होते. या रकमेच्या वादातून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार,  १५ रोजी वरणेश्वर महादेव मंदिर येथे आयोजित कुस्त्यांच्या कार्यक्रमासाठी रोहित गेला असता, तेथे विकी सपकाळे याने त्याच्याकडे ५ हजार रुपये व त्यावरील व्याजाची मागणी केली. व्याजाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे रोहितने सांगितले. त्यानंतर विकीने घरी येऊन व्याजासह रक्कम वसूल करणार असल्याचे सांगून तेथून निघून गेला.

यानंतर रात्री भीमनगर, ताडेपुरा येथे विकीसह चौघांनी रोहितवर धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. जखमी रोहितवर उपचार सुरू असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *