जळगाव, दि. २८ (प्रतिनिधी) – रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आणि जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘जळगाव क्रिकेट लीग – 2026 (JCL T-20 पर्व-2)’ साठी फ्रँचायझी ऑक्शन मोठ्या उत्साहात पार पडले. जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये झालेल्या या ऑक्शनमध्ये क्रिकेटप्रेमी आणि संघ मालकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली.
ऑक्शनमध्ये सर्वाधिक चुरस जळगाव किंग्स या संघासाठी पाहायला मिळाली. अखेरीस ही फ्रँचायझी दाल परिवाराने मिळवली. त्यानंतर झालेल्या आयकॉन खेळाडूंच्या लिलावात ओम मुंडे हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला चाळीसगाव चार्जर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळणार असून क्रिकेटप्रेमींना उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी होणारे संघ म्हणजे – जळगाव किंग्स, चाळीसगाव चार्जर्स, रावेर रॉयल्स, अमळनेर जायंट्स, जामनेर ब्लास्टर्स आणि पाचोरा टायटन्स. ऑक्शनमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघ मालकांचा सुतीहार देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी अतुल जैन, राजेंद्र लढ्ढा, अरविंद देशपांडे, मुख्य पंच संदीप गांगुर्डे आणि हितेश पटेल यांनी आयकॉन खेळाडूंसाठी ड्रॉ काढून बोली प्रक्रिया पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सूरज जहांगिर यांनी केले, तर अरविंद देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
संघ व मालकांची माहिती
जळगाव किंग्स
फ्रँचायझी मालक – दाल परिवार, प्रेम कोगटा, अतुल कोगटा
प्रशिक्षक – घनश्याम चौधरी
आयकॉन खेळाडू – जगदीश झोपे
चाळीसगाव चार्जर्स
फ्रँचायझी मालक – सागर पार्क क्रिकेट क्लब
प्रशिक्षक – सचिन सोनवणे
आयकॉन खेळाडू – ओम मुंडे
रावेर रॉयल्स
फ्रँचायझी मालक – सीए महावीर जैन
प्रशिक्षक – तनवीर अहमद
आयकॉन खेळाडू – नचिकेत ठाकूर
अमळनेर जायंट्स
फ्रँचायझी मालक – सुहांस केमिकल्स, संदीप काबरा
प्रशिक्षक – राहुल निंभोरे
आयकॉन खेळाडू – शुभम शर्मा
पाचोरा टायटन्स
फ्रँचायझी मालक – एस.के. ट्रान्सलाइन, हेमंत कोठारी
प्रशिक्षक – पंकज महाजन
आयकॉन खेळाडू – सचिन चौधरी
जामनेर ब्लास्टर्स
फ्रँचायझी मालक – रमेशदादा जैन
प्रशिक्षक – मुश्ताक अली
आयकॉन खेळाडू – शतायू कुलकर्णी
Author: K P Chavan
thepubliclive


