Home » जळगाव » जिल्हाधिकारी कार्यालयात 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जिल्हाधिकारी कार्यालयात 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव | दि. 2 (जिमाका) जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी दिली आहे.

यावेळी नागरिकांनी आपल्या वैयक्तिक हितसंबंधांशी संबंधित तक्रारी मांडाव्यात, मात्र त्या तक्रारी पूर्वी तालुका लोकशाही दिनात सादर केलेल्या असाव्यात आणि त्यावर एक महिन्याच्या आत कोणतेही उत्तर मिळालेले नसावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांचा वेळ, प्रवास खर्च आणि श्रम वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून 6 एप्रिल 2026 पासून पुढील सर्व लोकशाही दिनांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात येणार आहे.

यासाठी नागरिकांना आता जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अधिकृत संकेतस्थळावर

Jalgaon.gov.in वरून थेट अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्राप्त होणारे सर्व ऑनलाइन अर्ज संबंधित विभागांकडे lokshahidinjalgaon@gmail.com या ई-मेलद्वारे पाठविण्यात येणार असून संबंधित विभागांनी त्यावर कार्यवाही करून अहवालासह 6 एप्रिल 2026 रोजीच्या लोकशाही दिनास उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.

नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपल्या समस्या प्रभावीपणे मांडाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *