Home » राज्य » महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता; महापौरपदाच्या सोडतीकडे शहराचे लक्ष, अरविंद देशमुख चर्चेत

महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता; महापौरपदाच्या सोडतीकडे शहराचे लक्ष, अरविंद देशमुख चर्चेत

जळगाव – नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीने प्रचंड यश मिळवत ७५ पैकी तब्बल ६९ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे महापालिकेत महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाली असून, आता सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले आहे.

२२ जानेवारी, बुधवारी महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत होणार असून त्यानंतर महापौरपदाच्या निवडीचा मार्ग मोकळा होईल. या सोडतीनंतर महापौरपदासाठी हालचाली वेगाने सुरू होतील. महापौरपदाच्या रेसमध्ये अरविंद देशमुख यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपने सर्व ४६ जागांवर विजय मिळवत शंभर टक्के स्ट्राईक राखला आहे. शिवसेनेने २३ पैकी २२ जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. विरोधी पक्षात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ५ जागा आणि अपक्षाला एक जागा मिळाली आहे.

महापालिकेच्या सभागृहात नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे आणि जयश्री महाजन हे माजी महापौर पुन्हा निवडून आले आहेत. विशेषतः भंगाळे यांचा हा पाचवा कार्यकाळ असून त्यांचा अनुभव सभागृहाला दिशादर्शक ठरणार आहे.

आतापर्यंतचे महापौर व कार्यकाळ

– आशा कोल्हे (२००३–२००६)

– तनुजा तडवी (२००६–२००८)

– रमेश जैन (२००८–२००९)

– प्रदीप रायसोनी (२००९–२०११)

– अशोक सपकाळे (२०११)

– सदाशिव ढेकळे (२०११–२०१२)

– विष्णू भंगाळे (२०१२)

– जयश्री धांडे (२०१२–२०१३)

– किशोर पाटील (२०१३)

– राखी सोनवणे (२०१३–२०१६)

– नितीन लढ्ढा (२०१६–२०१७)

– ललित कोल्हे (२०१७–२०१८)

– सीमा भोळे (२०१८–२०२०)

– भारती सोनवणे (२०२०–२०२१)

– जयश्री महाजन (२०२१–२०२३)

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *