November 5, 2026 10:17 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Home » राष्ट्रीय » त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरण चर्चेत; भाविकाचा नशेत हल्ला, सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी कारवाई

त्र्यंबकेश्वर मंदिरातील मारहाण प्रकरण चर्चेत; भाविकाचा नशेत हल्ला, सुरक्षा रक्षकांनी बचावासाठी कारवाई

नाशिक : वृत्तसंस्था 

नाशिकमधील जगप्रसिद्ध त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात दर्शनासाठी आलेल्या भाविकावर सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाविकांमध्ये संताप आणि चर्चा पसरली. व्हिडिओमध्ये दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षक लाथाबुक्क्यांनी मारताना, तसेच त्याचे कपडे फाटलेले दिसत आहेत. उपस्थित इतर भाविकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये टिपला, ज्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर टीका वाढली.

मंदिर प्रशासनाचे विश्वस्त कैलास घुले यांनी या घटनेवर स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, हा भाविक पहाटे पावणे सहाच्या सुमारास मंदिरात आला होता आणि दर्शन बारीत एक तास ध्यान लावल्याने गर्दीला अडथळा निर्माण झाला. सुरक्षा रक्षकांनी त्याला बाजूला केल्यानंतर त्याने नियम मोडत गाभाऱ्यात घुसण्याचा प्रयत्न केला.

घुले यांच्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकाला हटकले असता भाविकाने शिवीगाळ करत रक्षकाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, ज्यात एका रक्षकाच्या डोळ्याला दुखापत झाली. बचावासाठी इतर रक्षकांनी त्याला चोप देऊन बाहेर काढले. चौकशीत समोर आले की, संबंधित तरुणाने अमली पदार्थांचे सेवन केले होते. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो सुशिक्षित कुटुंबातील असूनही नशेत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. अखेर, भाविकाने लेखी माफी मागितली आणि प्रकरण निस्तरले असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. सध्या सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी असते; अशा परिस्थितीत सुरक्षा रक्षकांचे कर्तव्य आणि भाविकांचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा लक्षवेधक ठरले आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!