पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत1.71 टक्क्यांनी घटला आहे. यंदा एकूण १५ लाख ६० हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ६८ हजार ५८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक ९९.०२ टक्के निकालाची टक्केवारी नोंदवली आहे, तर नागपूर विभाग सर्वात तळाला म्हणजेच ९२.४९ टक्के निकाल आहे.
विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पहाता येणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.
विभाग निहाय निकाल
पुणे – 94.89
नागपूर – 90.78
छत्रपती संभाजीनगर – 92.82
मुंबई -95.84
कोल्हापूर – 96.87
अमरावती – 92.95
नाशिक – 93.04
लातूर – 92.77
कोकण – 98.82



