September 29, 2026 4:47 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

‘सुधारित पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांना बसणार आर्थिक भुर्दंड

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली बहुचर्चित ‘एक रुपया पीक विमा योजना’ बंद करून त्याऐवजी ‘सुधारित पीक विमा योजना’ लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही योजना बंद झाल्याने आता शेतकऱ्यांना विमा योजनेतील पीकनिहाय हप्ता भरावा लागणार आहे. खरिपात दोन, रब्बीत दीड व नगदी पिकासाठी पाच टक्के हप्ता असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा […]

मुख्यमंत्र्यांचा बैठकीत निर्णय : राज्यात वाळू प्रतिब्रास 200 रुपये सवलत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार राज्य सरकारच्या वतीने कृत्रिम वाळू एम-सँड धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता बांधकामाला लागणारी वाळू उपलब्ध होण्यास सुविधा होईल. तसेच राज्य वेतन त्रुटी निवारण समितीचा अहवालही राज्य सरकारच्या वतीने […]

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : घरफोडीच्या दोन आरोपींना ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, एमआयडीसी पोलिसांनी संघटीत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या घरफोडीच्या दोन आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस […]

कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी टेन्शनमध्ये !

पुणे : वृत्तसंस्था राजाय्तील कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच संकटात सापडले आहे. यंदा हवामान अनुकूल असल्याने उत्पादनात मोठी वाढ झाली असली तरी भाव पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शेतकर्‍यांनी वेळेवर पेरणी, योग्य खते व कीड नाशकांचा वापर केल्यामुळे कांद्याच्या दर्जातही सुधारणा झाली आहे. रावणगाव, नंदादेवी, बोरीबेल, मळद, खडकी, राजेगाव, वाटलूज, नायगाव, खानोटे, स्वामी चिंचोली, मलठण भागातील […]

दहावीचा निकाल जाहीर : वाचा कोणत्या विभागाने मारली बाजी !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्‍या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा दहावीचा एकूण निकाल 94.10 टक्के इतका लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत1.71 टक्क्यांनी घटला आहे. यंदा एकूण १५ लाख ६० हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी […]

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश : मंत्री महाजनांचे व्हिडीओ हटवा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील जलसंपदामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याविरोधात युट्युबवर अपलोड करण्यात आलेले सहा कथित बदनामीकारक व्हिडिओ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच, अशा प्रकारचे आणखी कोणतेही व्हिडिओ किंवा लेख प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास मनाई निर्देश संबंधित युट्युबर्सना देण्यात आला आहे. न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने […]

मुलाला चोर म्हटल्याने एकाचा डोक्यात मारला झारा !

जळगाव : प्रतिनिधी पानटपरीवर मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी गेलेल्या मुलाला चोर म्हटल्याचा जाब विचारल्याने विशाल भाऊसाहेब मोरे (वय ३०, रा. गेंदालाल मिल) यांच्या डोक्यात थेट भजे तळण्याचा झारा मारला. ही घटना दि. ११ मे रोजी रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गेंदालाल मिल […]

वीज पडल्याने बैल जागीच ठार तर तीन गुरे जखमी, सालदार गंभीर भाजला !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील खर्दे येथे पोलीस पाटील संभाजी पाटील यांच्या शेतात सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान वीज पडल्याने बैल जागीच ठार होऊन तीन गुरे गंभीर जखमी झाले आहेत. तर सालदार देखील गंभीर जखमी भाजला आहे. तर लोंढवे येथे वादळी वाऱ्याने लिंबू बागा उध्वस्त झाल्या आहेत. खर्दे येथे संभाजी पाटील यांच्या शेतात कुट्टी करण्याचे काम […]

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील एका भागातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाला दि. ९ रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र तरी देखील मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक […]

आज जुने मालमत्तेचे वाद मिटतील. ज्यामुळे तुम्हाला संपत्ती मिळू शकते.

आजचे राशिभविष्य दि.१३ मे २०२५ मेष राशी आज व्यवसायात नवीन भागीदार मिळतील. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. तुम्ही मित्रासोबत पर्यटन स्थळी सहलीला जाऊ शकता. कोर्टकचेरीच्या बाबतीत शहाणपणाने वागा. यश मिळेल. राजकारणातून तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. वृषभ राशी आज जुने मालमत्तेचे वाद मिटतील. ज्यामुळे तुम्हाला संपत्ती मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित कामे वेळेवर करा. चांगल्या उत्पन्नाचे संकेत आहेत. […]

error: Content is protected !!