महागाईचा झटका : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारने थेट 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारा 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर आता ₹503 वरून ₹553 रुपयांचा झाला आहे, तर सामान्य ग्राहकांना एलपीजी गॅससाठी 803 रुपयांऐवजी आता ₹853 रुपये मोजावे लागणार…