अक्षय तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य !
|

अक्षय तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य !

पुणे : वृत्तसंस्था आज साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. गणरायाभोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास… मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती… प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली ही आंब्यांची आरास पाहण्याबरोबरच भाविकांनी पहाटे पासूनच गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या…

जनतेचे रक्षकच भक्षक झाले ; खा.निलेश लंकेंचा गंभीर आरोप !
| | |

जनतेचे रक्षकच भक्षक झाले ; खा.निलेश लंकेंचा गंभीर आरोप !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने २००४ ते २०१० या कार्यकाळामध्ये बनावट कागदपत्रे करून काढलेल्या बेसल डोस कर्जाच्या प्रकरण समोर आलं आहे. मंत्री विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यासह ५४ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

मनोज जरांगे पाटलांचा फडणवीस, भुजबळांवर घणाघात !
| |

मनोज जरांगे पाटलांचा फडणवीस, भुजबळांवर घणाघात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुती सरकार  पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकारविरोधात दंड थोपटलेत. त्यांनी येथे पत्रकारांशी बोलताना येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याची घोषणा केली. 29 ऑगस्ट रोजी मी मुंबईत उपोषणाला बसेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोपर्यंत आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत. ते तिथे मला…

नाशिक हादरले : ९ वर्षीय मुलाचा बापाने गळा दाबून केला खून !
|

नाशिक हादरले : ९ वर्षीय मुलाचा बापाने गळा दाबून केला खून !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक शहरातून मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. 9 वर्षांच्या मुलाची वडिलांनी गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. बाप एवढ्यावरच थांबला नाही. मुलाची हत्या केल्यानंतर त्याला एका गोणीत टाकून सासरवाडीत नेऊन पलंगावर टाकले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने बाप आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासला…

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू !
| |

हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू !

कोलकाता : वृत्तसंस्था दि. २९ रोजी मंगळवारी रात्री कोलकात्यातील फलपट्टी मासेमारी क्षेत्रातील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. २२ जणांना वाचवण्यात आले. अजूनही काही लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे. बचाव कार्य सुरू आहे. पोलिस आयुक्त मनोज वर्मा यांनी सांगितले की, रात्री ८:१५ वाजता ऋतुराज हॉटेलमध्ये आग लागली….

वडिलांच्या मारहाणीचा बदला घेवून गोळीबार करणारे सराईत गुन्हेगार अटकेत !
|

वडिलांच्या मारहाणीचा बदला घेवून गोळीबार करणारे सराईत गुन्हेगार अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी वडीलांना मारहाण करीत त्यांचा पाय फ्रैक्चर केल्याचा राग मनात होता. त्यामुळे हा बदला घेण्यासाठी मित्राचा वाढदिवस साजरा करीत असलेल्या महेंद्र समाधान सपकाळे (वय २०, रा. प्रबुद्ध नगर, पिंप्राळा) यांच्यावर गोळीबार करणाऱ्यांच्या रामानंद नगर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास मोहाडी येथून पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. सविस्तर…

२४ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू !
| |

२४ वर्षीय तरुणाचा शॉक लागून मृत्यू !

चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील वढोदा येथे २९ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील लोकल लाईनचा तार जोडण्यास गेले असता तालुक्यातील वढोदा येथील २४ वर्षीय दीपक तुकाराम पाटील या तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, वढोदा येथील रहिवासी व संपूले आश्रम शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर गोरख…

अमळनेर पोलिसांनी पकडला साडेचार किलो गांजा ; दोन अटकेत !
| |

अमळनेर पोलिसांनी पकडला साडेचार किलो गांजा ; दोन अटकेत !

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील कामतवाडी येथून जळगावला गांजा विक्रीसाठी नेणाऱ्या धरणगाव तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळील ९० हजार २४६ रुपये किमतीचा ४ किलो ५४६ ग्रॅम गांजा आणि ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ३५ हजार २४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सविस्तर माहितीनुसार, २८ रोजी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम…

लपलेल्या शत्रूंमुळे या राशीतील व्यक्तींचे व्यवसायात नुकसान होणार !

लपलेल्या शत्रूंमुळे या राशीतील व्यक्तींचे व्यवसायात नुकसान होणार !

मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचा फायदा मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचं काम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडणे शुभ राहील. भागीदारीच्या स्वरूपात व्यवसाय करण्याची शक्यता आहे. वृषभ राशी आज तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये पूर्ण यश मिळेल. लपलेल्या शत्रूंमुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते. कामाच्या दरम्यान अनावश्यक भांडणे आणि त्रासांमध्ये सहभागी होऊ नका. नवीन मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबत…