November 5, 2026 10:17 pm

लाईव्ह न्यूज :
जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात जिल्हा बँक निवडणुकीत अर्जुन पवार मैदानात! ओबीसी गटातून उमेदवारी अर्ज दाखल

Home » जळगाव » जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार : कंपनीच्या उत्पन्नात १७.४ टक्क्यांची वाढ

जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार : कंपनीच्या उत्पन्नात १७.४ टक्क्यांची वाढ

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव, ४ (प्रतिनिधी) – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ तिसऱ्या तिमाहीचे (Q3FY26) आणि नऊ महिन्यांचे (9MFY26) एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात कंपनीच्या उत्पन्नात (महसूलात) १७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न ₹१,५९८ कोटींवर पोहोचले असून EBITDA (व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा) ₹१६८ कोटींचा दिसतो आहे. या निकालामुळे बाजारात कंपनीच्या वाढीच्या क्षमतेबाबत गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.

तिसऱ्या तिमाहीत कंपनीची चांगली कामगिरी – उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन

“चालू आर्थिक वर्षाच्या या तिमाही कंपनीची चांगली कामगिरी झाली आहे त्यामुळे ती अत्यंत मजबूत ठरली आहे. सर्व व्यवसाय विभागांमध्ये दुहेरी अंकातील वाढ नोंदविण्यात आली आहे. अलीकडील जीएसटी दरांतील कपातीमुळे मागणीला चालना मिळाली असून महसूल वाढीस त्याची मदत झालेली आहे. कार्यक्षम अंमलबजावणी व रोख शिस्तीमुळे कार्यभांडवल चक्रात लक्षणीय सुधारणा झाली असून ऑपरेशन्समधून मजबूत रोख प्रवाह निर्माण झाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांत महसुलात सातत्यपूर्ण वाढ झाली असून मार्जिनमध्येही सुधारणा दिसून येत आहे. किरकोळ व्यवसायावर वाढलेला भर, कार्यक्षमता सुधारणा आणि खर्च नियंत्रण याचे हे सकारात्मक परिणाम आहेत.” केंद्रीय अर्थसंकल्पातील पायाभूत सुविधा खर्चामुळे पाइपिंग व्यवसायाला गती मिळेल, तर सौर कृषी पंप व ग्रामीण विकासावर केंद्रित धोरणामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या कृषी-प्रक्रिया विभागाने (JFFFL) नामांकित आणि अग्रगण्य शीत पेय कंपनी बरोबर नवीन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले असून Q4FY26 पासून नवीन प्रकल्पातून उत्पन्न योगदान अपेक्षित आहे. तसेच टोमॅटो प्युरी उत्पादनासाठी आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही कंपनी शाश्वत वाढ व भागधारकांना मूल्यनिर्मिती करण्यास कटिबद्ध असल्याचा विश्वास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी व्यक्त केला.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!