मोठी बातमी : गृहमंत्री शहांनी दिले सैनिकांना आदेश !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सर्व निमलष्करी दलांच्या प्रमुखांना रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत बोलावण्याचे निर्देश दिले. शाह जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सतत संपर्कात आहेत. सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित…