बालरंगभूमी परिषदेतर्फे आषाढीनिमित्त बालवारकऱ्यांची दिंडी !
जळगाव (प्रतिनिधी) : प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून बालकांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांना मराठी संस्कृती व साहित्याची गोडी लागावी यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. महाराष्ट्रातील संस्कृतीत पंढरपूरची वारी आणि संत वाङमयाची बालकांना ओळख व्हावी, या उद्देशाने रविवारी (दि.६) रोजी आषाढी एकादशीनिमित्ताने ‘वारी पंढरीची, दिंडी बालवारकऱ्यांची’ व ‘संत वेशभूषा स्पर्धा’ या उपक्रमांचे आयोजन…