छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू !
जळगाव : प्रतिनिधी शहरातील विद्यानगरात दि. ७ जुलै रोजी दुपारी छताला लावलेल्या दोरीचा गळफास लागून १२ वर्षीय हार्दिक प्रदीपकुमार अहिरे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने अहिरे कुटुंबावर शोककळा पसरली असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, विद्यानगरातील रहिवासी प्रदीपकुमार अहिरे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात….