जळगाव मनपाची नालेसफाई फक्त कागदावर? २५ लाखांचा टेंडर ?, पण काही नाले अजूनही घाणीतच !
जळगाव : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे यंदाही जळगाव महानगरपालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी पाच मुख्य नाले व १०२ उपनाल्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अनेक भागांतील उपनाल्यांची साफसफाई झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे दिसत नसल्याने, ही मोहीम केवळ कागदापुरती मर्यादित राहिली आहे का, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. महापालिकेने मे व जून महिन्यांत ठेकेदाराच्या माध्यमातून ही मोहीम राबवली…