महाराष्ट्रातील माणसाला सर्वांनी समर्थन द्यावे ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन !
मुंबई : वृत्तसंस्था उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची २१ ऑगस्ट ही अंतिम मुदत आहे. यासंदर्भात भाजपा मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर जेपी नड्डा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा…