बस आणि ट्रकची धडक : १६ प्रवासी गंभीर जखमी !
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतांना आता सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बस आणि ट्रकची धडक झाली असून, बसच्या एका बाजूचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, अपघात…