३४ वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख ; मुंबई पोलीस यंत्रणेत उडाली खळबळ !
मुंबई : वृत्तसंस्था देशातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी धमकी मिळाली आहे. व्हॉट्सॲपवरून ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत नंबरवर पाठवलेल्या संदेशात शहरात भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा दावा करण्यात आला आहे. या संदेशामुळे सुरक्षा यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तत्काळ शहरात हाय अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धमकीच्या संदेशात 34 वाहनांत बॉम्ब लावल्याचा उल्लेख आहे. यासोबतच,…