दसरा मेळावा : परवानगीचा तिढा आणि राज ठाकरे चर्चेत
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी दणक्यात होण्याची शक्यता आहे. कारण, दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ शिवसेनेच्या व्यासपीठावरून धडाडणार असल्याची चर्चा सुरू आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र शिवाजी पार्कवर सभा घेण्यास बीएमसीकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याने चिंतेत आहे….