सासरच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
बीड : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. आता त्याचीच पुनरावृत्ती बीडमध्ये घडली आहे. गेवराई तालुक्यातील राजुरी मळा येथे सोनाली बाळू वनवे (22) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सुरू असलेल्या जाचाला कंटाळून या विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात असून…