खळबळजनक : आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने आयुष्य संपविले !
धाराशिव : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता बंजारा समाजातील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मुरूम शहरात घडली आहे. नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेपूर्वी पवनने लिहिलेल्या चिट्ठीत ”मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे…