शंभर टक्के भरपाई द्या..अन्यथा महाराष्ट्र बंद ; जरांगे पाटलांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्याला अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव…