September 20, 2026 6:05 pm

शंभर टक्के भरपाई द्या..अन्यथा महाराष्ट्र बंद ; जरांगे पाटलांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्याला अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पूराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव […]

…वेळ पडली तर घरात बांधून ठेवू ; बच्चू कडू आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा हाहाकार सुरु असताना आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू, असा इशारा […]

एसीबीची धडक कारवाई : दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पंटरने घेतली १२ हजारांची लाच !

अमळनेर : प्रतिनिधी  गॅस भरण्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा हप्ता देण्याची सक्ती करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या पंटरचा लाचखोरीचा डाव अखेर उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही तिन्ही मंडळी १२,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई शहरातील पाचपावली मंदिराजवळ एका पान टपरीवर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील रहिवासी […]

जिथं गरजेचं आहे तिथं निकष शिथील ; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विशेषकरून मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा आजपासून सुरू केला. ते आज (दि२४) सकाळी सोलापूरातील माढ्यातील पूर परिस्थितीची पाहणी सुरू केली. त्यावेळी बोलताना त्यांनी आम्ही शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही मदत करताना हात आखडता घेणार नाही. अधिक निकष लावणार नाही. जिथं गरजेचं आहे […]

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून दहशत माजविणारा अटकेत !

पाचोरा : प्रतिनिधी शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगून दहशत माजविणाऱ्या समाधान बळीराम निकम (वय ३७, रा. जाधववाडी, पाचोरा, मूळ रा. अंजाळा, ता. यावल) याला पाचोरा पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना […]

कापड दुकानातच केला तरुणाने विवाहितेवर अत्याचार !

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील कापड दुकानात कामाला असलेल्या विवाहितेवर त्याठिकाणी काम करणाऱ्या तरुणाने अत्याचार केला. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी विजय गोपाल भोई (वय २२, रा. पाळधी, ता. धरणगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गावात असलेल्या एका कापड दुकानात विवाहित महिला कामाला होती, […]

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार !

जळगाव : प्रतिनिधी आजीचे निधन झाल्यामुळे मावशीकडे आलेला प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (१८, रा. लोंढरी, ता. जामनेर) हा दुचाकीने जात असताना वाहनाने धडक दिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) सुप्रिम कॉलनीजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, बारावीची परीक्षा उत्तीर्ण होवून महाविद्यालयीन शिक्षणासाठी जयपाल पाटील हा सध्या छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात राहत होता. […]

जळगावनजीक लहान मुलीसह आईने घेतली रेल्वेखाली उडी !

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेसमोर झोकून देत मनीषा सुरेश कावळे (वय २८, रा. नशिराबाद, ता. जळगाव) या विवाहितेने मुलगी गौरी सुरेश कावळे (वय ६) हिच्यासह आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास भादली रेल्वे पुलाजवळ घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळ पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

ब्रेकिंग : ‘त्या’ प्रकरणात मध्यरात्री विनोद देशमुखांना अटक !

जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी विनोद देशमुख यांना तीन वर्षांपूर्वीच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. ही अटक मंगळवारी (२३ सप्टेंबर) रात्री उशिरा रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी व्यावसायिक मनोज लिलाधर वाणी यांच्या कार्यालयावर हल्ला करून दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी […]

या राशीतील व्यक्तींना आज आर्थिक फायदा होणार !

मेष राशी आज तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुमच्या प्रामाणिकपणामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. महिला लवकरच घरातील कामांपासून मुक्त होतील, ज्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवता येईल. अनेक दिवसांपासून अडकून पडलेले पैसे परत मिळतील. वृषभ राशी आज, शिक्षकांच्या मदतीने, विद्यार्थ्यांचा एखादा प्रकल्प पूर्ण होईल. आज नशीब तुम्हाला आर्थिक लाभ देईल. आणि तुमच्या कठोर परिश्रमाचे दुप्पट […]

error: Content is protected !!