जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज हरकतीअंती अवैध ठरविण्यात आला आहे. भाजपचे प्रतिस्पर्धी उमेदवार सतीश शिंदे यांनी सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली होती. या हरकतीवर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुमित पाटील यांच्या उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र, अर्ज छाननीदरम्यान भाजपचे उमेदवार सतीश शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदविला. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर या हरकतीवर सुनावणी झाली. सुनावणीनंतर सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आला.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नसल्याची चर्चा आहे. महायुतीमधील दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून तिढा कायम असतानाच भाजपच्या उमेदवाराने थेट शिवसेनेच्या आमदाराच्या पुत्राच्या उमेदवारीला हरकत घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.
या घडामोडीमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील भाजप आणि शिंदे गटातील राजकीय समीकरणे पुन्हा चर्चेत आली आहेत. उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) याकडे कशी भूमिका घेते आणि पुढील निवडणूक प्रक्रियेत काय घडामोडी होतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Author: K P Chavan
jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN


