पोपटनगर (भोंडण तांडा) गावाची दुर्दशा : गटार पाइपलाइन फुटली, ग्रामपंचायत बेफिकीर!
पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील पोपटनगर (भोंडण तांडा) येथील ग्रामस्थ गेल्या चार महिन्यांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात जीवन जगत आहेत. गावातील मुख्य गटार नाल्यांची पाइपलाइन फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व घरांसमोर साचत असून, परिसरात गंभीर आरोग्यविषयक परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांनी सांगितले की, दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले असून, लहान मुलांना खेळताना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. डासांचा…