पोपटनगर (भोंडण तांडा) गावाची दुर्दशा : गटार पाइपलाइन फुटली, ग्रामपंचायत बेफिकीर!

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील पोपटनगर (भोंडण तांडा) येथील ग्रामस्थ गेल्या चार महिन्यांपासून अस्वच्छतेच्या विळख्यात जीवन जगत आहेत. गावातील मुख्य गटार नाल्यांची पाइपलाइन फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व घरांसमोर साचत असून, परिसरात गंभीर आरोग्यविषयक परिस्थिती निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांनी सांगितले की, दुर्गंधीमुळे श्वास घेणेही कठीण झाले असून, लहान मुलांना खेळताना संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. डासांचा […]
उद्धव ठाकरेंनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी अन दिला शेतकऱ्यांना धीर !

धाराशिव : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून सध्या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील ईटकूर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्याच्या अनेक भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान […]
मोठी बातमी : जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूलची मान्यता रद्द !

जामनेर : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील जैन इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेबाबत पालकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी या शाळेची मान्यता आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या २८८ विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित शाळांमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये दुसरीतील ३० विद्यार्थ्यांचे समायोजन […]
राज्यात पावसाचा हाहाकार : राज ठाकरेंनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकारामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. अनेकांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील बळीराजाचं कुटुंब पुन्हा […]
जळगाव एसीबीची कारवाई : फोनपे अॅपवर अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी जळगावातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्र अधिकार्याला १५ हजार रुपयांची लाच मागून ती खाजगी पंटराद्वारे फोनपे अॅपवर स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईत आरोपी अधिकारी राजेंद्र पांडुरंग सूर्यवंशी (४२, रा. नवआकाश सोसायटी, धात्रक फाटा, नाशिक) याला अटक करण्यात आली असून, खाजगी पंटर मनोज बापू गाजरे मात्र पसार झाला आहे. या धाडसी […]
धावत्या रेल्वेखाली सापडून प्रौढाचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी आसोदा रेल्वे उड्डाण पुलाखाली धावत्या रेल्वेखाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बुधवारी २४ सप्टेंबर सकाळी या व्यक्तीची ओळख पटली असून, तो शहरातील वाल्मीक नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय ५५, रा. वाल्मीक नगर, जळगाव) […]
आपला पाणीपुरवठा खंडित केला जाईल : उद्योजकांची आर्थिक फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी रात्रीपासून आपला पाणीपुरवठा खंडित केला जाईल’, असे बनावट संदेश उद्योजकांना पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हे बनावट संदेश असून, त्यावर विश्वास न ठेवण्याविषयी एमआयडीसीने स्पष्ट केले असून, तसे उद्योजकांना कळविण्यासह सायबर पोलिस ठाण्यातही पत्र दिले आहे. वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याचे बनावट संदेश पाठवून यापूर्वी अनेकांची […]
जळगाव पोलिसाचे कृत्य : महिलेवर केले अनेक वर्ष अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून अनेक वर्ष अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. कोलकाता येथील महिलेच्या फिर्यादीवरून दि. २३ सप्टेंबरला रात्री उशिरा जळगाव शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीचे नाव नितीन सपकाळे असून, तो जळगाव पोलिस दलात पोलिस कॉन्स्टेबल पदावर […]
१८ वर्षीय युवकाने घेतली तापी नदीत उडी !

भुसावळ : प्रतिनिधी शहराजवळील तापी नदीच्या पुलावरून अक्षय नीलेश चौधरी (१८) या तरुणाने नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजेच्या वाजेच्या दरम्यान घडली. या तरुणाचा शोध नदी पात्रात घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नदीत उडी घेण्याच्या आधी अक्षयने आपल्या एका मित्राला मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला व गुडबाय केले. अन्य एकानेही तो तापी नदीच्या पुलावरून […]
तुम्ही मोठ्या व्यावसायिक गटासोबत भागीदारी करण्याचा विचार करणार !

आजचे राशिभविष्य दि. २५ सप्टेंबर २०२५ मेष राशी आज तुम्हाला तुमच्या वडिलांकडून प्रेरणा मिळेल. आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते यशस्वी होईल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याबाबत तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून सूचना मिळतील. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल. सगळे तुमचं कौतुक करतील. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी एक अद्भुत दिवस असणार […]