खा.कोल्हेंनी काढला मोर्चा अन झाली पोलिसांशी बाचाबाची !
पुणे : वृत्तसंस्था येथील चाकण परिसरातील वाहतूक कोंडी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आज मोठा उद्रेक पाहायला मिळाला. खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली चाकणमधील ग्रामस्थ आणि एमआयडीसीतील कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र, मोर्चेकरांना कार्यालयाच्या आवारात प्रवेश नाकारल्याने अमोल कोल्हे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. मोर्चेकरांना कार्यालयात सोडण्याच्या मुद्द्यावरून अमोल कोल्हे चांगलेच आक्रमक झाले होते….