अर्धवेळ स्त्री परिचारिकांना दिवाळीपूर्वी मानधन वितरित होणार : मुख्य कार्यकारी अधिकारींच्या निर्देशानंतर कार्यवाहीला गती
जळगाव, दि. १० ऑक्टोबर : अर्धवेळ स्त्री परिचारिकांच्या मानधनाबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्यामुळे सप्टेंबर महिन्याचे मानधन जमा होऊ शकलेले नाही, मात्र आता निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली असून दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचे मानधन वितरित करण्यात येईल. तसेच, ऑक्टोबर महिन्याचे मानधनही त्याचबरोबर देण्यात येणार आहे, अशी…