अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस अधीक्षकांचा थेट कारवाईचा बडगा : महसूल विभागाचे मौन संशयास्पद !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असून, महसूल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी बुधवारी दुपारी स्वतः पुढाकार घेऊन अशा बेकायदा वाळू वाहतुकीवर थेट कारवाई करत प्रशासनाला सजग केले. बुधवारी दुपारी सुमारे दोनच्या…