२ फॉर्च्यूनर, २ थार, ७ ट्रॅक्टर बक्षीसात : बैलगाडा शर्यतीची राज्यभर चर्चा !
सांगली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात दाखल झालेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आता राजकारणासोबतच खेळाच्या मैदानावरही लक्ष वेधून घेतले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात तासगावजवळ येत्या 9 नोव्हेंबर रोजी भव्य बैलगाडी शर्यतीचे आणि बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे….