रिक्षातून खिसे कापणारे चोर पकडले : जळगाव गुन्हे शाखेची कुशल तपास मोहीम !
जळगाव : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील बुरहानपूर (कोतवाली) पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. २०२/२०२५, बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे रिक्षात प्रवाशी बसवून त्यांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या प्रकरणाचा तपास करत असताना हा गुन्हा जळगावातील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहिती नुसार, या गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड…