मंत्री महाजनांचा बालेकिल्ला अजून भक्कम; जामनेरमध्ये साधना महाजन बिनविरोध !
जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक असताना, जामनेर नगरपरिषदेने भाजपच्या खात्यात पहिला मोठा विजय जमा केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने स्थानिक राजकारणात भाजपवरचं वर्चस्व अधोरेखित झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक दावे–प्रतिदावे होत होते….