जळगाव महापालिका निवडणूक प्रभारीपदी मंगेश चव्हाण !
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची जळगाव महानगरपालिका निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. या संदर्भात दिलेल्या नियुक्तीपत्रात आमदार मंगेश चव्हाण हे आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर भारतीय जनता पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन अथक परिश्रम करतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त…