कोपरगावमध्ये मतदानाला गालबोट : मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादी समर्थक आमने-सामने !
नाशिक : वृत्तसंस्था कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान शहरातील एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानाला दुपारच्या सुमारास अचानक तणावाचे वळण लागले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला. मतदारांवर उमेदवारांचे प्रतिनिधी दबाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात आला….