ठाकरे बंधूंची युती होताच मनसेला खिंडार : जिल्हाप्रमुख शिंदे गटात दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची घोषणा होत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. खांबेकर यांच्यासोबत मराठवाड्यातील मनसेच्या आणखी तीन जिल्हाध्यक्षांनीही शिंदे गटाची वाट धरल्याने…