उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर नवल नाही : मंत्री महाजनाचे सूचक विधान !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राजकारण तापले असताना, मंत्री गिरीश महाजन यांच्या एका सूचक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “आज भाजपवर टीका करणारे अनेक नेते भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे उद्या संजय राऊतही भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको,” असे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना…