जळगाव मनपात भाजपमध्ये नाराजी; अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची तिकिटे कापली
जळगाव : प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताना अनेक निष्ठावंत व जुने कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवकांची तिकिटे कापल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. अनेक प्रभागांमध्ये पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी…