जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न !
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या प्रगती, गुणवत्ता व प्रत्यक्ष अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत रावेर, चोपडा व यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत की नाहीत, याची स्थळनिहाय…