जळगाव महापालिका निवडणुकीत ५३.५९ टक्के मतदान; शेवटच्या तासांत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव – जळगाव महापालिका निवडणुकीत गुरुवारी एकूण ५३.५९ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी मतदानाची गती मंदावलेली असताना शेवटच्या दोन तासांत मतदारांनी मोठ्या संख्येने केंद्रावर हजेरी लावली. या कालावधीत तब्बल १९ टक्के मतदान झाले. त्यामुळे दिवसभरातील एकूण मतदानाचा टक्का २०१८ च्या तुलनेत दोन टक्क्यांनी घटलेला दिसून आला. किरकोळ वादविवाद वगळता संपूर्ण शहरात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार…