वेशांतर, पळापळ अन् अखेर अटक; चिमुरडी पुन्हा आईच्या कुशीत

मुंबई : वृत्तसंस्था तीन महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या टोळीला मुंब्रा पोलिसांनी अत्यंत कौशल्याने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल १६०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण, तांत्रिक तपास आणि अहोरात्र मेहनतीच्या जोरावर पोलिसांनी अकोला जिल्ह्यातून अपहृत बालिकेची सुखरूप सुटका केली. या धाडसी कारवाईमुळे मुंब्रा पोलिसांच्या चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी […]
‘ढेकणं आणि गिधाडं घात करू शकतात’ : सुनेत्रा पवारांना जरांगे पाटील यांचा सल्ला

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदी निवडीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया […]
मोठी बातमी : साखरेचा कोटा अपुरा; निविदा व बाजारभावात वाढ

पुणे : वृत्तसंस्था केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख ५० हजार मेट्रिक टन साखरेचा कोटा जाहीर केला असून, मागणीच्या तुलनेत कोटा अपुरा ठरल्याने साखरेच्या दरांत वाढ झाली आहे. साखर कारखान्यांवरील निविदा दर प्रतिक्विंटल १०० रुपयांनी वाढून ३,६५० रुपये झाले आहेत. याचबरोबर घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल ५० ते १०० रुपयांनी वाढून ४,००० रुपयांवर […]
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदी, राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा कोण सांभाळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर हा प्रश्न सुटला असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांनी आज सायंकाळी ५ वाजता मुंबईतील लोकभवनात मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सुनेत्रा पवार […]
शिरसोली ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामसेवकाची सभेतून ‘पळकाढू’ भूमिका; ग्रामस्थ आक्रमक, सभा रद्द करण्याची मागणी

शिरसोली : प्रतिनिधी लोकशाहीचा कणा असलेल्या ग्रामसभेला जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.नं. ग्रामपंचायतीत प्रशासकीय गोंधळाचे ग्रहण लागले आहे. ग्रामसभा सुरू असताना नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी चक्क ग्रामसेवकानेच सभेतून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामसभेतील ठराव प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला असून, प्रशासनाने नागरिकांची दिशाभूल केल्याचा संतापजनक आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कायदेशीर प्रक्रियेची पायमल्ली […]
रेकॉर्डनंतर क्रॅश; सोने ३३ हजारांनी, चांदी लाखभर स्वस्त

मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांना अचानक मोठा धक्का बसला आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घसरण झाली असून, सोन्याच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. प्रती १० तोळे सोन्याच्या दरात एका झटक्यात ३३ हजार रुपयांहून अधिक घट झाली आहे. ही घसरण केवळ वायदे […]
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची माहिती नाही – शरद पवारांचे स्पष्ट मत

मुंबई : प्रतिनिधी सुनेत्रा पवार यांच्याबाबत घेण्यात आलेला निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचा अंतर्गत निर्णय असून, त्यावर कोणतेही भाष्य करणार नसल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे प्रमुख खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे नेते असून त्यांनी काय करावे हा त्यांचा निर्णय […]
जामनेर–भुसावळ वाहनचोरीचा पर्दाफाश; दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत जामनेर व भुसावळ परिसरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जामनेर येथून अनुराग लक्ष्मण सूनगत (वय १९) आणि दर्शन […]
जळगाव बाजार समितीच्या गेटसमोर ट्रॅक्टर पलटी; मोठा अनर्थ टळला !

जळगाव : प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी एका अनियंत्रित ट्रॅक्टरने महामार्गावर वळण घेत असतांनना ट्रॅक्टरचे ट्रॉली हे पटली झाली आहे. यात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार दि.३० जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा माल खाली करून ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ बीजी ८४१६ भाजीपाला मार्केटच्या मुख्य […]
तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमच्या नोकरीत यश मिळण्याची शक्यता आहे.

आजचे राशिभविष्य दि.३१ जानेवारी २०२६ मेष राशी आज, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील चालू समस्या सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला लक्षणीय यश मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी तुमच्या योजना यशस्वी होतील. उत्पन्नाच्या संधी निर्माण होतील. तुमच्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसतील. कौटुंबिक जीवन […]